पोटापुरतं इनोव्हेशन निसर्ग सर्वांनाच शिकवतो उपजतपणे. मेंदुच्या क्रिएटिव कप्प्यात उमललेली ही फुलं कोण कसं कशापुरतं वापरतं हा भाग वेगळा.
आता हे नागपूरात शंकरनगर पोस्ट ऑफिस जवळ नाग नदीच्या काठावर बसुन मोटार- सायकलींची पंक्चर काढणाऱ्या राजू सोमकुवरचं इनोव्हेशन पहा. एकीकडं महाराष्ट्रभर लाईट गेल्यावर पंक्चरची दुकानं तासनतास वेटींग मोडवर असतात गेली कित्येक दशके, तिथं हा गडी विना लाईट एकदम टाईट पंक्चर काढतो. त्यासाठीचा त्याचा हा सरंजाम अफलातून आहे.
माहित नाही नागपूरातल्या रस्त्यारस्त्यांवर असे आणखी किती राजू आहेत.

No comments:
Post a Comment