Monday, January 1, 2018

विदर्भायन आरंभ

सर्वांना नमस्कार,

मी विदर्भात (गडचिरोली व नागपूर) येवून आता सहा सात महिने उलटून गेलेत. मला इथल्या मातीत मिसळायला अडचण येणार नाही याची खात्री होती. मात्र एवढ्या लवकर ती मला तिच्यात रुजवून घेईल असे वाटले नव्हते. रुजलोय आणि इथलं हवा, पाणी आकाश कवेत घ्यायचा प्रयत्न करतोय.

गेली दोन दशके मी महाराष्ट्रभर, देशभर अनंत ठिकाणी फिरलोय, भटकलोय, जिथे जाईल तिथल्या निसर्गाशी एकरुप होत मानवापासून दगडधोंड्यांपर्यंत प्रत्येकाशी वेवलेंथ जुळवून मनीचं गुण मनोमनी जावून घ्यायचा प्रयत्न केला आणि व्यक्तही झालोय मजा जसं उमगलं तसं आपल्या सर्वांसमोर. तुमचं माझं नातं माझ्या शब्दांनी जोडलं गेलंय याची मला जाणिव आहे आणि ते नातं अधिक वृद्धिंगत व्हावं म्हणून आता हा नव्या ब्लॉगला प्रपंच आहे.

विदर्भाच्या कानाकोपऱ्यात फिरताना, इथल्या निसर्गाशी एकरुप होताना, निसर्गयात्रींशी गुजगोष्टी करताना, इथलं ऊन वारा पाऊस पिताना, इथल्या मानसांच्या काळजाशी काळीज भिडवताना मला पावलोपावली जे काही दिसत जाईल, उराउरी भिनत जाईल आणि त्यातलं ते मला तुम्हाला अतिशय तिव्रतेने भावनातिरेकानं सांगावंस वाटेल ते मी या ठिकाणी सांगत जाईल...

आशा आहे, या ठिकाणचं लिखाण आपणास माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरेल. कुणा मित्रांना त्यातलं काही आपल्या वेबसाईटवर किंवा मासिका किंवा दैनिकात वगैरे काही डिस्पॅचेस वगैरे वापरावेसे वाटले तर मला विचारायची गरज नाही. बिनधास्त वापरु शकता. (अट एकच... क्रेडिटलाईन द्ययची आणि  एडिट करताना त्यात स्वतःच्या मनाचं काहीही घुसडायचं नाही. नाय तं मी ILS Law College चा विद्यार्थी आहे, कोर्टात केस लढवायला मला काय वकिलांना पैसे द्यावे लागत नाहीत ;-) )

चला तर मग... करतो सुरवात आजपासून... लक्ष असू द्या...

No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...